Thursday, October 30, 2008

काळोखाचा सागर

काळोखाचा सागर कितीही अफाट असला,
तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातच....
हा सागर सनातन आणि बेटंही सनातन,
म्हणून अखेर मीच ठरवायचा की....
काळोखाच्या लाटांवर वाहत जाणारा,
पराभूत नावाडी मी व्हायचं की प्रकाशाच्या
बेटांवर सूर्यकिरणांची लागवड करणारा शेतकरी व्हायचं...

- कुसुमाग्रज

No comments: