Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Thursday, October 30, 2008

लाट

लाटेचं असतं एकच उद्दिष्ट
कसहि करून किनारयाला गाठायचं.....
किनारयाला नसेल का वाटत
कधी लाटेकडे धावावं?
कदाचित वाटत असुनही
त्याला ते शक्य नसावं.....
आधार द्यायचं वचन
त्याचं जमिनीशी पक्कं असावं......

- अनामिक (माझ्या संग्रहातून)

काळोखाचा सागर

काळोखाचा सागर कितीही अफाट असला,
तरी त्यात प्रकाशाची बेटं असतातच....
हा सागर सनातन आणि बेटंही सनातन,
म्हणून अखेर मीच ठरवायचा की....
काळोखाच्या लाटांवर वाहत जाणारा,
पराभूत नावाडी मी व्हायचं की प्रकाशाच्या
बेटांवर सूर्यकिरणांची लागवड करणारा शेतकरी व्हायचं...

- कुसुमाग्रज